आजच्या आधुनिक युगामध्ये वेगवेगळ्या ऊर्जा स्त्रोतापासून आपण आपली ऊर्जेची गरज भागवत आहोत. कोळसा, लाकडे,रॉकेल, पेट्रोल ह्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोताबरोबरच आज सौर ऊर्जा. पवनचक्की पासून तयार होणारी ऊर्जा, सीएनजी सारखे biofuel ह्यांच्यापासून सुद्धा आपली ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणात भागवली जात आहे. आधुनिक संशोधनाने हे स्त्रोत आता विश्वसनीय वाटत आहेत. सौर ऊर्जा तर भारतासारख्या देशात सर्वत्र मुबलक प्रमाणात मिळणारा ऊर्जा स्त्रोत आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्या वापरासाठी कश्या पद्धतीने करून घेऊ शकतो हे आपण आज पाहणार आहोत.ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात 3 phase विजेची समस्या आपल्याला अनुभवायला मिळते. महिन्यात प्रत्येक आठवड्याला 3 phase ची शिफ्ट बदलत असते. त्यामुळे आपल्याला कधी रात्री उशिरा, मध्यरात्री किंवा पहाटे पहाटे पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. नाही म्हणल तरी हे काम स्वतः शेतकरी वर्गच करतो. त्यामुळे अपुरी झोप, बिघडणारी दिनचर्या ह्यासारख्या समस्यांना त्याला तोंड द्यावे लागते. ह्याला उपाय म्हणून आपण आपल्या शेतातील पंपाला सौर उर्जेवर चालवू शकतो. ह्यामुळे आपल्याला सकाळी 8 वाजता पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यन्त अखंड पाणी मिळू शकते. विशेष म्हणजे ह्या पाण्यासाठी तुम्हाला MSEB च्या लाइट वर अवलंबवून असण्याची गरज संपते. आपल्याला हवे तितक्या वेळ आपण पिकांना पाणी देऊ शकतो. चित्रामधे दाखविल्याप्रमाणे सोलार पॅनल च्या सहाय्याने सौर उर्जेवर हा पंप चालतो. पॅनल वर पडणार्या सुर्याप्रकाशातून वीज निर्मिती होते. आणि त्यावर आपला पंप चालतो. असे पंप लावण्यासाठी सरकार सुद्धा काही योजनांमधून प्रोत्साहन देत असते. सध्या मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतात अनुदानित सौर पंप बसवू शकतात. त्यामध्ये महत्वाची अट हीच आहे की शेतकर्याच्या शेतात कुठलाही पारंपरिक ऊर्जा स्त्रोताद्वारे वीज आलेली नसावी. म्हणजे सदरील संकेत स्थळावर जाऊन घेता येईल. ज्यांच्याकडे MSEB चे कनेक्शन आहे असे शेतकरी स्वखर्चावर सौर पंप लावू शकतात. सुरवातीचा खर्च जरी जास्त असला तरी मुबलक प्रमाणात सकाळच्या वेळेमधे मिळणारा ऊन आणि पाणी बघता, पिकाचे उत्पन्न वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे ही एक दूरगामी गुंतवणूक म्हणून पाहायला हरकत नाही. तसेच सौर ऊर्जेचा वापर करून आपण घरातील सर्व उपकरणे चालवू शकतो आणि आपल्याला MSEB च्या वीज बिलापासून कायमची मुक्ती मिळू शकते. शेतातील सर्व मशीन, घरातील सर्व उपकरणे हे सौर उर्जेवर चालल्याने आपली पैश्याची प्रचंड प्रमाणात बचत होते. सौर ऊर्जा वापरल्याने आपल्याकडुन देखील पर्यावरणपूरक अश्या ऊर्जेचा वापर करता येईल आणि ही ऊर्जा मेंटेनेंस फ्री असल्याने आपल्याला ह्या उर्जेपासून काहीही तोटा नाही. ग्रामविकासकडे लक्ष देताना ग्रामपंचायती मार्फत आपण गावामध्ये जे स्ट्रीट लाइट बसवतो ते सुद्धा सौर उर्जेवर चालतात. सकाळच्या वेळेमधे सौर उर्जेवर ह्या लाइट मधील बॅटरी चार्ज होते व जशी संध्याकाळ होते तसे हे लाइट ऑटोमॅटिक लागतात. गेल्या 5-7 वर्षात जवळपास सर्व गावांमध्ये आपण हे लाइट पहिले असतीलच. परंतु बॅटरी चोरी होण्याचे प्रमाण पाहता त्या लाइटचा उपयोग तेवढा नव्हता. परंतु आधुनिक लाइट मध्ये बॅटरी ही खांबाच्या टोकाला लाइट सोबतच दिल्यामुळे बॅटरी चोरी ही जवळजवळ अशक्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे गावामध्ये पूर्ण वेळ लाइट आपल्याला अनुभवायला मिळू शकते. त्यासाठी सरकारने सर्व ग्रामपंचायती मध्ये आवश्यक असा निधि उपलब्ध करून दिला आहे. सरपंच आणि ग्रामसेवक ह्यांच्या निदर्शनास आणून एक सुजन नागरिक म्हणून आपल्या गावासाठी आपण हे नक्कीच करू शकतो. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त आपल्या रोजच्या आयुष्यात करून आपल्या देशाला पारंपरिक ऊर्जा स्त्रोतापासून मुक्त करून एक “सोलार नेशन” कडे नेण्याकडे आपण आपल्यापासून सुरवात करून खरीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. मकरंद अयाचित Founder, Techsowth Electrical Infra
+91 7385101392
ayachit.makarand@gmail.com
Mobile: +91 8767451089
customer.service@solarmarts.in
advertise@solarmarts.in
jobposting@solarmarts.in
blog@solarmarts.in
solarmarts@gmail.com
Thanks for contacting us! We will get in touch with you shortly
copyrights © 2020-2025 Solarmarts.in. Proudly developed by CodingBit. All rights reserved.
Write Your Comments